
संस्थापक मनोगत
संत-महंत, महापुरुष,समाजसुधारक, संशोधक,महिला,विचारवंत,सैनिक, किसान-श्रमिक, उद्योजक-विद्यार्थी,कलावंत आणि पर्यावरणप्रेमी – यांच्या महान विचार कार्याला वंदन!
क्रांती ग्रामविकास संस्था – समाजपरिवर्तनाची प्रेरणादायी चळवळ
समाजाच्या समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी समर्पित राहून कार्य करण्याची नितांत आवश्यकता असते. क्रांती ग्रामविकास संस्था सन 2000 मध्ये सामाजिक उद्देशाने स्थापन झाली आणि आज ती समाजपरिवर्तनाच्या दिशेने एक प्रेरणादायी चळवळ म्हणून ओळखली जाते. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, रोजगार, कौशल्य विकास, विज्ञान-तंत्रज्ञान, सन्मान, निसर्ग संवर्धन आणि शिक्षण प्रबोधन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये संस्था विधायक कार्य करीत आहे.
माहिती
शैक्षणिक योगदान – ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकासाठी :
संस्थेने गरजू आणि अनुसूचित जातीतील गरीब ऊसतोड मजुरांच्या मुला-मुलींसाठी "महात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळा", कोळपिंपरी येथे सन 2002-03 मध्ये सुरू केली.
- विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य वातावरण आणि मोफत सुविधा उपलब्ध.
- कौशल्य विकास व विविध उपक्रमांचे आयोजन, जे त्यांना आत्मनिर्भर बनवतात.
- शाळेला ISO मानांकन आणि प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
ही शाळा केवळ शिक्षण देत नाही, तर व्यक्तिमत्त्व विकासाचे पाठशाळा म्हणून कार्य करते. येथे मिळणाऱ्या संस्कारांमुळे विद्यार्थी समाजात एक जबाबदार आणि सुजाण नागरिक म्हणून घडतात.
प्रेरणादायी कार्य – सर्वांगीण विकासासाठी योगदान
संस्था समाजहिताचे विविध उपक्रम प्रस्तावित आहेत :
- वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र – जेष्ठ नागरिकांना शांतता व आनंद मिळावा यासाठी विशेष उपक्रम.
- शेतकऱ्यांसाठी पशु संवर्धन (गोपालन)व चिकित्सालय – ग्रामीण भागातील पशुपालकांसाठी मदतीचा हात.उभारत आहे.
- सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन – पर्यावरणपूरक शेती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने टिकवण्यासाठी मार्गदर्शन.
- कौशल्य पार्क आणि विज्ञान-तंत्रज्ञान विकास उपक्रम – युवकांना आधुनिक कौशल्य आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी.
संस्थेने विज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाला विशेष महत्त्व दिले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवीन संधी उपलब्ध होतील.
सहकार्य आणि योगदान – समाजातील मान्यवरांचा पाठिंबा
संस्थेला विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच समाजप्रेमी नागरिकांचे सहकार्य लाभत आहे. या सहकार्यामुळेच संस्था समाजपरिवर्तनाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे.
संस्थेच्या कार्यामध्ये आपले मार्गदर्शन, सूचना आणि संकल्पना यांचे आम्ही नेहमी स्वागत करू. आपल्या सक्रिय सहभागामुळे संस्था आणखी जोमाने कार्य करू शकेल.
आभार व भविष्यातील उद्दिष्टे :
संस्थेच्या यशामागे असलेल्या सर्व सहकार्यकर्त्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी विधायक आणि उपयुक्त कार्य करण्याची आमची प्रेरणा अविरत राहील.
आपल्या माहिती-तंत्रज्ञान वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभार मानतो.
धन्यवाद!
नोंदणी प्रमाणपत्र
सभासद

सुरेश भगवान यादव
अध्यक्ष
चंद्रकांत वामनराव देशपांडे
उपाध्यक्ष
तुकाराम धोंडीराम यादव
सचिव
शेख असोफोदीन दस्तगीर
सहसचिव
सुरेश सोळंके
सदस्य
दत्ता गणेश गोतावळे
सदस्यफोटोगॅलरी
व्हिडीओ गॅलरी
बातम्या
संपर्क
पत्ता
मु.कोळपिंपरी, पो.अंजनडोह, ता.धारूर, जि.बीड. ४३११२४
मोबाईल नंबर
+91 86 40 005 177
इ-मेल
office@krantigram.org